मायावतींच्या जातीवाचक टीकेला मोदींचे प्रत्युत्तर म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बसपा नेत्या मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातीवरून टीका केली होती. त्यावरूनच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायावती यांना प्रत्युत्तर दिले आहे. देशातील गरिबांची जी जात असेल तीच जात माझी असल्याचे उत्तर मोदी यांनी दिले आहे.

मायावतींच्या टीकेला उत्तर देताना मोदी म्हणाले, “आता हे देखिल सुरु केले आहे की मोदींची जात कोणती आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की माझी जात ही देशातील गरिबांची जी जात आहे तिच आहे”, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पंतप्रधान असते तर शेतकऱ्यांची स्थिती चांगली असली असती. मात्र, आम्ही पटेलांचा पुतळा उभा केला त्यालाही या लोकांचा विरोधा असल्याची टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.

जे काही केले ते देशासाठी आणि देशवासियांसाठी
यावेळी बोलताना मोदी म्हणले, “मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. गेल्या पाच वर्षांपासून मी पंतप्रधान आहे. पण माझे अकाऊंट पहा माझ्या नावावर बंगला आहे का पहा. मी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी काहीच साठवले नाही. मी जे काही केले आहे ते फक्त देशासाठी आणि देशाच्या नागरिकांसाठी केले आहे”. असे मोदी म्हणाले

काय आहे मायावतींचा आरोप ?
पंतप्रधान मोदी राजकीय स्वार्थासाठी स्वत:ला मागासवर्गीय म्हणवतात, असा आरोप मायावतींनी केला. ‘मोदी जर खरंच जन्मानं मागास असते, तर संघानं त्यांना कधी पंतप्रधान होऊ दिलं असतं का,’ असा सवाल त्यांनी ट्विटच्या उपस्थित केला होता. त्याला आता मीडिअनकडून उत्तर देण्यात आले आहे.