PM नरेंद्र मोदींनी AIIMS मध्ये घेतली कोरोना प्रतिबंधक लस; केली ‘चला देश कोरोना मुक्त करु’ची घोषणा

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस टोचून घेतला.

कोविड १९ विरुद्ध जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी त्वरीत केलेले कार्य उल्लेखनीय आहे़, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी पहिला डोस घेतल्यानंतर दिली . चला देश कोरोना मुक्त करु अशी घोषणाही त्यांनी दिली आहे़ जे लस घेण्यास पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

 

आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी ६ वाजताच दिल्ली येथील एम्स रुग्णालयात गेले. तेथे त्यांना सिस्टर पी निविदा यांनी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी भारत बायोटिक्सची कोव्हॅक्सीन या लसीचा पहिला डोस दिला.