Coronavirus : ‘मराठी’सह 11 भाषांमध्ये असलेले ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे PM मोदींचे ‘आवाहन’

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरनाविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारने ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. नागरिकांनी हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेऊन कोरोना विषयी माहिती मिळवू शकतात. ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप मराठी, हिंदी, इंग्रजी अशा 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे, तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अ‍ॅप आम्हाला महत्त्वाची माहिती देईल. लोक जितके अधिक या अ‍ॅपचा वापर करता तितके प्रभावी होईल. पंतप्रधानांनी अ‍ॅपची लिंक शेअर करत देशातील जनतेला हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र सरकारने हे मोबाइल अ‍ॅप 2 एप्रिल रोजी लाँच केले आहे. ज्यामुळे लोकांना कोरोना विषाणूचा धोका समजण्यास मदत होईल. जवळपास संक्रमणाचा धोका असेल त्यावेळी प्रशासनाला या अ‍ॅपद्वारे अलर्ट पाठवला जाणार आहे. जप आपण एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या जवळ असाल तर अ‍ॅपद्वारे याची माहिती प्रशासनाला मिळेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like