पाय धुवून सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज यथील कुंभ मेळ्याला भेट दिली. तेथील गंगा नदीत पंतप्रधान मोदी यांनी स्नान केले. तसेच संगम घाटावर पूजा देखील केली त्यानंतर नुकताच एका वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमधील व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतानाचा हा व्हिडीओ आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी ‘स्वछ भारत मिशन’ हाती घेतले. एव्हढेच नाही तर देशभर हे मिशन राबवण्यात देखील येत आहे. पण नेहमी आपले काम चोख करणाऱ्या सफाई कामगारांचे पाय धुवून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

रविवारी पंतप्रधान मोदी कुभमेळ्याला भेट देणार असल्याने मोठी तयारी करण्यात आली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्व परिस्थितीवर जातीने लक्ष ठेऊन होते. मोदींच्या आगमनापूर्वी योगी आदित्यनाथ कुंभमेळ्यात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्रीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच, योगींनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मोदींनी तीन नद्यांच्या पवित्र संगमावर डुबकी लगावली आणि पूजा केली. त्यानंतर योगींनी संगमतटावर आरती केली. यावेळी उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे हे देखील उपस्थित होते.

Loading...
You might also like