PM नरेंद्र मोदी थोडयाच वेळात जनतेला संबोधित करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकार प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान मोदी हे दररोज त्याबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी बैठका घेत आहेत. दरम्यान, आता थोडयाच वेळात म्हणजे रात्री 8.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संबोधित करणार आहेत.

कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. काही राज्यात रूग्ण ऑक्सिजन अभावी तडफडून दगावले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी नेमकं काय बोलणार की आणखी कोणता मोठा निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.