अरुण जेटलींच्या पत्रानंतर मोदींनी घेतली जेटलींची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे वरिष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली यांना त्यांच्या पहिल्या निर्णयावर पुनर्विचार करायला सांगितले आणि जेटली यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

जवळपास १५ ते २० मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या एक दिवस आधी अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवले होते की, जेटली यांना मंत्री बनवण्याचा विचार करण्यात येऊ नये. जेटली यांनी आरोग्याचे कारण पुढे करत लिहिले की गेल्या १८ महिन्यांपासून त्यांची तब्येत खराब आहे. अशा परिस्थिती ते केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी सांभाळू शकणार नाहीत. यांमुळे त्यांना मंत्री बनवण्याचा विचार करण्यात येऊ नये.

नव्या सरकारचा उद्या शपथविधी होणार आहे. जेटली यांनी पत्रात म्हंटले की, माझ्याकडे कोणतीच जबाबदारी नसल्यामुळे माझ्याजवळ अनौपचारिक रित्या सरकार आणि पक्षाला पाठींबा देण्यासाठी वेळ मिळेल.

Loading...
You might also like