देशाच्या विकासासाठी PM मोदींचं मोठं पाऊल, आता ‘भारत छोडो’ अभियान करणार आणखी ‘जलद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) राष्ट्रीय स्वच्छता केंद्र (आरएसके) चे उद्घाटन केले महात्मा गांधी यांना समर्पित राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची सर्वात पहिली घोषणा पंतप्रधान मोदी यांनी 10 एप्रिल 2017 रोजी गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहास 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केली होती. आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनाची आठवण करुन दिली.

भारत छोडोचे हे संकल्प स्वराज्यापासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत. याच अनुशंगाने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोडो’चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून 15 ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवूयात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा यावेळी नारा दिली.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाला कमकुवत बनवणाऱ्या दुर्गुणांनी भारत सोडावं, यापुढे अजून काय चांगलं होऊ शकतं. याच विचारासह गेल्या सहा वर्षापासून देशात एक व्यापक भारत छोडो अभियान सुरु केले असल्याचे मोदी म्हणाले.

देशातील भारत छोडो हे अभियान अधिक जलद करण्यात येणार आहे. भारताचा विकास करण्यासाठी आणि देशातील कमकुवत करणाऱ्या दुर्गुणांना देशाबाहेर काढण्यासाठी गेल्या सहा वर्षापासून हे अभियान महत्त्वपूर्ण असून येत्या काळात त्याला अधिक व्यापक करण्याची तयारी सुरु आहे.