PM मोदींचं स्वप्न पूर्ण होणार, CM केजरीवालांनी दिले ‘हे’ आदेश

नोएडा : वृत्तसंस्था –   नोएडा विकास प्राधिकरणने सातत्याने नोएडला स्वच्छ, हरित आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता प्राधिकरणद्वारा शहरातील सर्वच यू-टर्न आणि रस्त्यांवर गवतांपासून तयार केलेल्या प्राण्यांची आकृती तयार केली जाणार आहे. तसेच शहरात जागोजागी सुंदर कलाकृती देखील तयार केल्या जात आहेत. यामुळे शहर अधिक सुंदर व हिरवेगार दिसत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला हिरवेगार आणि स्वच्छ करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

अथॉरिटीचे ओएसडी इंदु प्रकाश यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न देशाला हिरवेगार आणि स्वच्छ बनवणे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण शहरात वृक्षारोपण करवून आणले आहे. तसेच शहर सुशोभित करण्यात येत आहे. नोएडा करण्यात येत असलेल्या कामांचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

इंदु प्रकाश यांनी सांगितले की, आता नोएडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यपालक अधिकारी ऋतु माहेश्वरी यांच्या निर्देशानुसार नोएडा सजवण्यात येत आहे. ज्यामध्ये सेक्टर 35,51 यू-टर्नसह 6 जागांवर कृत्रिम गवतांपासून प्राण्यांची आकृती तयार केली जात आहे. तसेच एलिवेटेड रोड आणि सेक्टर 18 मध्ये चित्रकारांकडून सुंदर पेटिंग्स केली जात असल्याने याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे