पंतप्रधान नरेंद्र मोदीची ‘ही’ भविष्यवाणी १०० % ठरली ‘खरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यात झालेले महागठबंधन भाजपाला मोठा धक्का देऊ शकते, अशी अटकळे लावली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याची टिका करुन लोकसभा निवडणुकीनंतर ते बुआ -बबुआ यांची जोडी तुटणार असल्याची भविष्यवाणी केली होती. पोटनिवडणुकीत बसाप स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा मायावतीने केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचे दिसून येऊ लागले आहे.

बसापच्या प्रमुख मायावती यांनी विधानसभेच्या ११ पोटनिवडणुका स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा मंगळवारी सकाळी केली. आमचे समाजवादी पक्ष व अखिलेश यादव यांच्याशी असलेले चांगले संबंध तसेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या ११ पोटनिवडणुका बसाप स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मायावती यांनी पक्षनेत्यांच्या बैठकीत सांगितले आहे. समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करुन काहीही फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजवादी पक्ष आणि बसाप यांनी १२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजपाला उत्तर प्रदेशातच मोठा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाऊ लागले. २०१४ मध्ये मोदी लाट असताना सपा व बसाप यांची एकत्रित मते किमान २९ मतदारसंघात अधिक होती, असे आकडेवारी दाखवित होते. त्याआधारे या दोन्ही पक्षाने आघाडी केली. मात्र, त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा त्यांना मिळाल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत शुन्य जागा मिळविणाऱ्या बसापला १० जागा मिळाल्या. मात्र समाजवादी पक्ष आपल्या ५ जागा वाढवू शकला नाही.

बसापच्या नेत्यांच्या बैठकीत मायावती यांनी सपाबरोबर केलेल्या आघाडीचा काहीच फायदा झाला नाही. सपाच्या कार्यकर्त्यांनी बसापच्या उमेदवारांचे काम न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागठबंधन निवडणुकीनंतर टिकणार नाही. २३ मेनंतर बुआ – बबुआची जोडी तुटणार असल्याचे सांगितले होते. मायावती यांनी विधानसभेच्या ११ जागा स्वतंत्रपणे लढविण्याचा विचार व्यक्त केल्याने पंतप्रधान मोदी यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे.