…म्हणून प्रचारादरम्यान इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी काढला पळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही कधी एखादा नेता प्रचारादरम्यान पळ काढताना पाहिला आहे. अशीच एक घटना इस्त्रायल देशांच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबरोबर घडली. सभा सुरु असताना नेतन्याहू यांना रॉकेटचा आवाज आल्याने ते तेथून निघून सुरक्षित स्थळी गेले. इस्त्रायलच्या हल्ल्यात इस्लामिक जिहाद कमांडर मारला गेल्यानंतर या देशात वरचेवर मिसाइल हल्ले होत असतात. याची भीती फक्त देशातील जनतेलाच नाही तर पंतप्रधानांना देखील आहे. नेतन्याहू सभेच्या दुसऱ्या दिवशी पक्षाच्या प्रायमरीसाठी प्रचार करत होते.

इस्त्रायलमध्ये रॉकेटचा आवाज ऐकून पंतप्रधान मध्येच कार्यक्रम सोडून जाण्याची ही काही पहिली वेळ नाही, काही महिन्यांमधील ही दुसरी घटना आहे. गाजा येथे इस्लामिक कमाडंर ठार झाल्यानंतर 200 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. त्यात अनेक नागरिक मारल्या गेले.

गाजापट्टीकडून इस्त्रालयच्या दिशेने डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आयरन डोम संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून रोखण्यात आल्याची माहिती इस्त्रालयच्या लष्कराने दिली. क्षेपणास्त्रे डागल्यानंतर पॅलेस्टाइन एन्क्लेव्हजवळ आणि दक्षिणेतील शहर अश्केलॉनमध्ये सायरन वाजू लागले. नेतन्याहून तेव्हा अक्शेलॉमध्ये सभेत होते.
इस्त्रायलच्या शासकीय प्रसारणकर्ते केएएन 11 ने काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. यात सुरक्षा रक्षक पंतप्रधान नेतन्याहू यांना रेड अ‍ॅलर्टची माहिती देताना दिसत आहेत.

10 डिसेंबरला लिकुड पक्षांच्या प्रमुखांना देखील दक्षिणी शहर असलेल्या अशदोदमधील एक सभा सोडून जावे लागले होते. गाजा पट्टीत लावलेल्या सायरन वाजल्यामुळे लिकुड पक्षाच्या प्रमुखांना सभा सोडावी लागली होती. इस्त्रायलच्या दिशेने दोन क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इस्त्रायलच्या लष्कराने दिली. याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दोन लढाऊ विमानांद्वारे क्षेपणास्त्र डागण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/