पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार असलेल्या वीज प्रकल्पाच्या आॅफीसमध्ये बॉम्बस्फोट

काठमांडू : वतसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पातील आॅफीसजवळ बॉम्बस्फोट झाला. पंतप्रधान यांच्या कार्यक्रताची तयारी सुरु असतानाच हा बॉम्बस्फोट झाल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.

नेपाळच्या पूर्व भागातील तुमलिंगतर परिसरात असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ मे रोजी करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी भारतील इंजिनिअर्सनी नेपाळला मदत केली आहे. नेपाळमध्ये वीजेची मोठी टंचाई जाणवत आहे. यापूर्वी १७ एप्रिलला भारतीय दुतावासाजवळ प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात दुतावासाच्या भिंतीचे नुकसान झाले होते.

तुमलिंगतर परिसरातील अरुण ३ जलविद्युत या ९०० मेगा वॉट प्रकल्पासाठी सतलज जलविद्युत निगम ने नेपाळबरोबर २५ नोव्हेबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या वेळी करार करण्यात आला होता. या करारानुसार हा प्रकल्प तयार झाला असून त्याचे आता उद्घाटन करण्यासाठी येत्या ११ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत.

या बॉम्बस्फोटाविषयी संखुवासभा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिवा राज जोशी यांनी सांगितले की, या बॉम्बस्फोटामुळे वीजप्रकल्पाचा आॅफिसचे किरकोळ नुकसान झाले आहे. कोणीही जखमी झाले नाही. कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.