मोबाईल नंबर एकाचा, कुटुंब भलत्याचे; पंतप्रधानांच्या आयुष्यमान योजनेचा सावळा गोंधळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुरुवात येत्या २३ सप्टेंबरपासून करणार आहेत. ही पंतप्रधान नरेंद्र मोदीची महत्त्वकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेचा सावळा गोंधळ सुटता सुटत नाहीये.

पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत १० कोटी कुटुंबाना ५ लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंड येथून राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे.  यासाठी 30 एप्रिलपासून एक मोहीम चालविण्यात आली होती. याद्वारे या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांची माहिती, मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर गोळा करण्यात आले होते.

पण, मोबाईल नंबर एकाचा आणि नावे दुसऱ्यांचीच असे प्रकार झाल्याने दोन्ही कुटुंबे ५ लाखांच्या विमा संरक्षणापासून मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्यांची माहीती mera.pmjay.gov.in दिली आहे. याच वेबसाईटवर तपासल्यांनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d477c0d-bbe5-11e8-9097-d378ef991666′]

मंत्रालय मारहाण प्रकरण कर्मचारी-अधिकाऱ्यांना भोवलं
सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्गच्या एका कुटुंबप्रमुखाचा मोबाईल नंबर टाकून त्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता हिंगोलीच्या गिरगावातील एका कुटुंबाचे नाव समोर आले. या कुटुंबामध्ये सात जणांचा समावेश आहे. या गोंधळामुळे सिंधुदुर्गमधल्या कुटुंबासह हिंगोलीतील कुटुंबही या योजनेच्या लाभापासून मुकण्याची शक्यता आहे.

हिंगोली सिंधुदुर्गपासून सुमारे 600 किमी दूर आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल नंबर 2010 पासून सिंधुदुर्गमध्ये वापरात आहे. तर, जनगणना 2011 मध्ये झालेली होती. तसेच 30 एप्रिल 2018 पासून एसईसीसीने मोहीम राबविली होती. ज्यात ग्रामसभांमधून योजनेसाठी पात्र असणाऱ्या कुटुंबांचे मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड घेण्यात आले होते. तरी ही हा गोंधळ उडतो कसा..? असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे हा मोबाईल नंबर गेल्या 9 वर्षांपासून सिंधुदुर्गमध्ये वापराला जात आहे.

पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ फक्त १० कोटी कुटुंबांनाच मिळणार आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबांचाही समावेश आहे. यामुळे आधीच बरीच गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यात जर अश्या प्रकारचा सावळा गोंधळ असेल तर, ज्या कुटुंबांना योजनेत समाविष्ट आहे त्यांना ही लाभापासुन मुकावे लागेल.

[amazon_link asins=’B072XP1QB7,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7f5e2ad8-bbe6-11e8-8cf3-0b710964cd18′]