”…तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल”

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंनी म्हटलं की, केंद्राकडून जो निधी आला होता तो परत पाठवण्यासाठी फडणवीसांना औटघटकेचं मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस हे ८० तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा भाजपा खासदार अनंत हेडगे यांनी केला होता. परंतु अनंत हेगडेंचा हा दावा देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला. फडणवीस म्हणाले की, केंद्राला एकही पैसा परत देण्यात आलेला नसून सरकारच्या अर्थ विभागानं सत्य काय आहे ते समोर आणून पडताळणी करण्याचे आवाहन फडणवीसांनी केले आहे.

यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. कारण निधी हा केंद्राकडे परत गेलेला आहे आणि आढळून आल्यास या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुन्हा चौकशी करण्यात येईल असे प्रखर शब्दात त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिक म्हटले की, बुंद से गई तो हौदसे नही आती, कुठे तरी भाजपा उघडा पडल्यानंतर झाकण्यासाठी असं बोललं जातंय. ४० हजार कोटी आल्यानंतर परत पाठवणे शक्य नाही. जर पाठवले असतील तर पंतप्रधान पायउतार झाल्याशिवाय राहणार नाहीत. पंतप्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल. महाराष्ट्र आणि राज्यांवर हा अन्याय आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना धारेवर धरले. तसेच आनंद हेडगे देखील सांगत आहेत की, ४० हजार कोटी रुपये परत पाठवण्यासाठी देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.

‘बुलेट ट्रेन असो वा इतर कोणता अन्य प्रकल्प, केंद्र सरकारनं कधीच राज्याकडे हात पसरलेला नाही आणि याच कारणामुळे राज्याकडूनही कधी केंद्राला पैसा पुरविण्यात आलेला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे केंद्राला ४० हजार कोटी रुपये परत करण्यासाठी मुख्यमंत्री झाले, हे अतिशय चुकीचं आणि बेभरवशाचे विधान आहे. बुलेट ट्रेनच नव्हे, तर इतर कोणताही प्रकल्प असो, त्या प्रकल्पातला पैसा राज्य सरकारनं केंद्राला परत पाठवलेला नाही. मुख्यमंत्री किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मी असा निर्णय कधीच घेतला नाही. असे फडणवीस म्हटले असून ज्याला सरकारची आर्थिक निर्णय प्रक्रिया व्यवस्थितरीत्या समजते, त्यालाच ही गोष्ट समजू शकते. कारण अशा प्रकारे पैसा देता-घेता येत नाही’, असं माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या अर्थ विभागानं सत्य समोर आणावं, असं आवाहनदेखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

हेगडे काय म्हणाले होते ?

हेडगेंनी मोठा गौप्यस्फोट करत सांगितले की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला माहीतच असेल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ८० तासांत आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला. हे सगळं घडवून आणल्याचे संकेत त्यांनी दिले आणि पुढे जाऊन ते म्हटले की, त्यांनी हे संपूर्ण नाटक का घडवून आणलं? बहुमत नसतानादेखील ते राज्याचे मुख्यमंत्री का झाले? त्यांनी असा निर्णय का घेतला? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,’ असं भाजपाचे खासदार अनंत हेगडे म्हणाले. आणि यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ८० तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या मागील राजकारण आणि अर्थकारण नेमके काय होते हे सांगितलं. खरंतर ‘काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास केंद्राकडून जो निधी आला आहे त्याचा गैरवापर होईल याची देवेंद्र फडणवीसांना आधीपासूनच कल्पना होती त्यामुळे ही संपूर्ण नाट्यमय खेळी रचण्यात आली होती असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच १५ तासांमध्ये ४० हजार कोटींचा निधी केंद्राकडे परत पाठवला,’ असं हेगडे यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे प्रचंड खळबळ माजली असून त्याबाबत चर्चांना राज्यात उधाण आले आहे.

Visit : Policenama.com

You might also like