पंतप्रधान वाढदिवस साजरा करणार वाराणसीत 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. मोदी त्यांचा वाढदिवस त्यांच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये साजरा करणार आहेत. यानिमित्ताने वाराणसीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आज मोदी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

[amazon_link asins=’B074CKGTVQ,B01N0TE4P7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0459474c-ba2b-11e8-a44b-23526ac28fc7′]

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतील. त्यानंतर ते शाळकरी मुलांसोबत ‘चलो जिते है’ हा चित्रपट पाहतील. हा चित्रपट मोदींच्या आयुष्यावर आधारित आहे. मागील वाढदिवसाला मोदींनी गांधीनगरला जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी सरदार सरोवराचे लोकार्पण केले होते.

लग्नात मित्राला गिफ्ट दिले पाच लिटर पेट्रोलचे कॅन

गेल्या वर्षीप्रमाणेच यावषीर्ही मोदी अनेक नव्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये बाबतपूर-शिवपूर रस्त्याचे विस्तारीकरण, रिंग रोडचा पहिला टप्पा यांच्यासह बनारस हिंदू विद्यापीठातील काही प्रकल्पांचा समावेश आहे. मोदी यांच्या वाराणसी भेटीच्या पार्श्वभूमीवर काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरातील सुरक्षेचा आढावा घेतला.