पंतप्रधानांचे ‘ट्विट’ ‘या’ कारणामुळे नाही पोहचू शकले आंदोलकांपर्यंत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना सोमवारी पुन्हा आवाहन केले. यापूर्वीही त्यांनी ट्विट करुन ईशान्य भारतातील नागरिकांना याचा त्रास होणार नाही, असे आश्वासन देणारे ट्विट केले होते. पण, त्यांच्यासाठी त्यांनी हे ट्विट केले आहे. त्यांच्यापर्यंत ते पोहचू शकले नाही. कारण दंगलग्रस्त भागातील इंटरनेट सेवा शासनानेच बंद ठेवले होते. आसामसह ईशान्य भारतातील अनेक भागात अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचे केलेले आवाहन त्यांच्यापर्यंत पोहचलेच नाही.

नागरिकत्व संशोधन कायद्याबाबतचे विधेयक संसदेत मंजूर झाले. त्याचवेळी आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरु झाले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ डिसेंबर रोजी ट्विट करुन आवाहन केले की, मी आसामच्या आपल्या भाईबहिणींना आश्वस्त करु इच्छितो की नागरिकत्व संशोधन बिल पास झाल्याने कोणीही चिंता करण्याची जरुरत नाही. मी आपल्याला आश्वासित करु इच्छितो की कोणी त्यांचे अधिकार, आपली वेगळी ओळख आणि खुबसुरत संस्कृती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ती सातत्याने फलती फुलती राहील़, अशा शब्दात आसामच्या तरुण तरुणींना आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, हे ट्विट आंदोलकर्त्यांपर्यंत पोहचू शकले नाही. कारण त्याच्याअगोदरच आसाममधील दंगलग्रस्त १० जिल्ह्यातील इंटरनेट सेवा प्रशासनाने बंद केली होती. त्याचबरोबर त्रिपुरा व अन्य काही ठिकाणची इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. ज्या भागात शांतता आहे, तेथील लोकांनाच पंतप्रधानांचे ट्विट पाहता आले. त्यांच्यापर्यंत पोहचू शकले.

Advt.

रविवारी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील जेएनयु, लखनौमधील लखनौ विद्यापीठसह देशातील अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुदैर्वी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जामिया मिलिया इस्लामिक, जेएनयु, लखनौ सह अनेक विद्यापीठांनी ५ डिसेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तसेच या विद्यापीठांच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत केली. त्यामुळे पंतप्रधानांचे हे ट्विटही बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/