COVID-19 : जगभरात हाहाकार ! ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांची ‘कोरोना’ व्हायरसची टेस्ट ‘पॉझिटिव्ह’

वृत्तसंस्था – जगभरात हाहाकार घालणार्‍या कोरोना व्हायरसमुळं हजारो लोकांचे बळी गेले आहेत. चीन, इटली, अमेरिकेसह जगभरात सर्वत्र कोरोनानं थैमान घातलं आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार ब्रिटनच्या शाही परिवारावर देखील कोरोनानं अटॅक केला असून प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.


भारतात देखील आतापर्यंत कोरोनानं 11 जणांचे बळी घेतले आहेत तर 550 हून अधिक रूग्ण कारोनानं संक्रमिट झाले आहेत. चीन, अमेरिका आणि इटलीमध्ये तर अनेकांचे बळी गेले आहेत.

इटलीत कोरोनाचे थैमान सुरुच, 24 तासात 743 बळी

गेल्या दोन दिवसांपासून इटलीमध्ये कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा कमी कमी होत होता.परंतू मंगळवारी मृतांची संख्या अचानक पुन्हा वाढल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. चोवीस तासात तब्बल 743 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे इटलीत आता मृतांचा आकडा 6820 इतका वाढला आहे.

चीनच्या वुहानमधून सुरु झालेल्या कोरोनाचा कहर जगातील सर्वच देशांत पसरला आहे. आतापर्यंत एकूण 4 लाख 21 हजरा 792 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर त्तील 1 लाख जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. मात्र इटलीमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. मंगळवारी इटलीमध्ये 5249 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.त्यामुळे इटलीतील कोरोना बाधितांची संख्या आता 69 हजार 176 इतकी झाली आहे. त्यातील 8326 जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर 54 हजार बाधितांवर उपचार सुरु आहेत.