home page top 1

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

लंडन : दुबईचे प्रमुख शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची पत्नी हया बिंत अल हुसैन गेल्या आठवड्यात २७१ कोटी रुपये घेऊन दुबईमधून पळून गेली होती. ही राजकुमारी एका ब्रिटिश बॉडीगार्डबरोबर पळून गेली होती. हया सध्या लंडनमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. हया कडून लवकरच तलाकची घोषणा होऊ शकते.

शेख मोहम्मद आणि राजकुमारी हया यांच्यामध्ये मुलांचे संगोपन, कुटुंबाचे विभाजन आणि संपत्ती या विषयी वाद चालू आहेत. याच वादावरून न्यायालयात खटला चालू आहे. या महिन्याची शेवटी या खटल्याचा निकाल दिला जाईल.

खटला चालू असतानाच राजकुमारी हया यांनी दुबई सोडले. राजकुमारी इंग्लंडला पळून गेली असून बेकिंगम पॅलेस या आलिशान परिसरात तिने एका मोठ्या घराची खरेदी केली आहे. या परिसरात जगातील सर्वात महाग घरे आढळतात. या ठिकाणी राजकुमारी मुलांसोबत आनंदाने राहत आहे.

राजकुमारी हया मोहम्मद यांची सहावी पत्नी आहे. गेल्या वर्षी शेख मोहम्मद यांची मुलगी लतिफाने देशातून पळून जायचा प्रयत्न केला होता. यानंतर राजकुमारी हया आणि शेख मोहम्मद यांच्यातील संबंध बिघडले. राजकुमारी हया जॉर्डनचे शासक हुसैन यांची मुलगी आहे. राजकुमारी यांनी त्यांच बालपण इंग्लंडमध्ये घालवल आणि तिला इंग्लंडमध्येच रहायला आवडते. २००४ साली तिचे लग्न शेख मोहम्मद यांच्याशी झाले.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

Loading...
You might also like