Coronavirus : स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचा ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे निधन झाले आहे. त्या 86 वर्षाच्या होत्या. त्यांचा भाऊ प्रिन्स सिक्स्टो एनरिक डी बॉरबोन यांनी फेसबुक पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. 26 मार्च रोजी राजकुमारींचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. संपूर्ण जगातील एखाद्या रॉयल कुटुंबातील हा पहिला मृत्यू आहे. देश आणि जगातील बरेच लोक या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत, परंतु मृत्यूच्या बाबतीत ही मोठी बातमी स्पेनमधून समोर आली आहे. युरोपियन देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे इटलीनंतर स्पेनवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे.

राजकुमारीच्या भावाने एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की 86 वर्षीय राजकुमारीचा कोरोनामुळे पॅरिसमध्ये मृत्यू झाला. शुक्रवारी माद्रिद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकुमारीचा जन्म पॅरिसमध्ये 1933 मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण फ्रान्समध्ये झाले होते. एका अहवालानुसार, त्या पॅरिसमधील सोर्बोन आणि माद्रिदमधील कॉम्प्लुटेन्स युनिव्हर्सिटीत प्राध्यापक होत्या. विदेशी मीडियाच्या वृत्तानुसार, राजकुमारी मारिया टेरेसाला रेड प्रिन्सेस म्हणूनही ओळखले जात असे, कारण त्या इमानदार प्रवृत्तीच्या होत्या आणि त्यांना सामाजिक कार्याचीही आवड होती, तसेच त्या सामाजिक कार्यात भाग देखील घेत असत. राजकुमारीच्या कुटुंबात बरेच इतर सदस्यही आहेत.

स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे मोठी तबाही झाली आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत 3400 हून अधिक लोक मरण पावले आहेत. याबाबतीत स्पेन आणि इटलीने चीनलाही मागे सोडले आहे. स्पेनच्या देशात इमरजेंसी लागू केली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.