निवृत्त IAS आधिकऱ्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुजन समाज पार्टीचे सुप्रीमो, मायावती यांचे सचिवपद भूषवलेलया रिटायर्ड IAS आधिकऱ्याच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात मिळालेली रक्कम आणि मौल्यवान वस्तू पाहून छापा टाकणाऱ्या आधिकऱ्यांचे देखील डोळे विस्फारले. या छाप्यात २०० करोड पेक्षा जास्त संपत्ती सोबतच मौल्यावान वस्तू मिळाल्या आहेत. यात एक ५० लाख रुपयांचा पेन सुद्धा मिळाला आहे. नेतराम असे त्या रिटायर्ड IAS आधिकऱ्याचे नाव आहे. ते १९७९ च्या बॅच चे IAS आधीकारी होते.

याबात बमिळालेली अधिक माहिती अशी की, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एक डायरी मिळाली आहे ज्यात २५० करोडच्या संपत्ती विषयी माहिती लिहण्यात आले आहे. याबरोबरच शेल या कंपनीच्या शेअर्सची कागदपत्रे देखील हाती लागली आहेत.

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, नेतराम यांनी ९५ करोड रुपयांची स्थावर मालमत्ता देखील खरेदी केली आहे. ज्यातील एक दिल्ली आणि इतर दोन मुंबई आणि कलकत्त्यात आहेत. आयकर विभागाची कारवाई अजून चालूच आहे. सूत्रांनी सांगितले की या व्यक्तीच्या आणखी संपत्तीचा खुलासा झालेला नाही अजूनही तपास चालू आहे. लवकरच त्याविषयी माहिती पुढे येईल.

असे मानले जाते की, नेतराम बसपा अध्यक्ष मायावती यांचे जवळचे व्यक्ती आहेत. जेव्हा मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हा नेतराम यांचा दबदबा होता. असे देखील सांगण्यात येत आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत ते बसपा कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत होते. पण त्यापूर्वीच आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू विरोधात हुंडा आणि लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

दानशूरता ! समाजसेवेसाठी अझीम प्रेमजी यांचं 1,45,000 कोटींचं दान, बिल गेट्सलाही टाकले मागे

अर्जून खोतकरांबद्दल कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांचा मोठा गौप्यस्फोट

३ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

खोतकरांना उमेदवारी द्या ! अन्यथा शिवसेना भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन