आनंदऋषीजी सेंटरमध्ये गरोदर तसेच स्तनदा माता व नातेवाईकांना प्राधान्य

पुणे : पोलीनसनामा ऑनलाई – अहमदनगर येथील जैन सोशल फेडरेशन संचलित प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्सचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्वसामान्यांसोबतच गरोदर माता, स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्यात येत आहे अशी माहिती संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे ८५% पेक्षा जास्त आजार हे मनाकायीक (सायकोसोमॅटिक) आहेत. म्हणजे कमजोर व अशक्त मनामुळे निर्माण होतात. जर आपण मनालाच शक्तीशाली बनविले तर भविष्यात होणाऱ्या आजारापासून आपली सुटका होईल.तसेच आजार झालाच असेल तर औषधउपचारासोबतच मेडिटेशन करणे आवश्यक आहे. मेडिटेशनमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमधील हिलींग पॉवर वाढते व रूग्ण इतर रूग्णापेक्षा लवकर व पूर्ण बरा होतो. हृदयरोग, कॅन्सरसारख्या गंभीर रोगावर झालेल्या संशोधनाद्वारे हे सिध्द झाले आहे.

आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर आपल्याला मेडिटेशनने सुविधा उपलब्ध करून दिलीआहे. या सुवर्णसंधीचा गरोदर माता, स्तनदा माता समवेत त्यांचे पती, सासुबाई, आई, नणंद, बहिण किंवा इतर नातेवाईकांनाही याचा लाभ घेता येईल. किंबहुना गरोदर माता/ स्तनदा माता समवेत कमीत कमी एक नातेवाईक असणे आवश्यक आहे. हा कोर्स २५ मार्च ते ३० मार्च २०१९ या कालावधीत दुपारी ४ ते ५.३० या वेळेत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर, आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या बेसमेंटला, आनंदऋषीजी मार्ग, अहमदनगर येथे संपन्न होईल. निरोगी व सुखी जीवनाची गुरकिल्ली म्हणजेच राजयोगा मेडिटेशन जीवनपध्दती होय. याचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ घ्यावा नावनोंदणीसाठी प्रिया दिदी, दत्तात्रय वारकड याच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्यावतीने केले आहे.