केस कापल्याच्या कारणावरून कैद्याचा कारागृह अधिकार्‍यावर हल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या बंद्याने येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी दुपारी जेलरवर हल्ला केला. त्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सर्वच कैदी जोराने ओरडून गोंधळ घालू लागले. कारागृहातील सुरक्षेचे सायरन वाजल्याने तत्काळ पोलीस पथक कारागृह परिसरात दाखल झालं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

नेहमीप्रमाणे दुपारी कारागृहातील बराखींची सहाय्यक कारागृह अधीक्षक शेख पडताळणी करत होते. त्यावेळी आरोपी राहुल उर्फ शिणू शिंदे (राहणार जामनकर) याला शेख यांनी केस असे का कापले? म्हणून विचारले. भडकलेल्या राहून थेट शेख यांच्यावर हल्ला केला. बंद्याकडून मारहाण होत असल्याचं लक्षात येताच सिद्धार्थ कर्मचारी मदतीला धावून आले. त्यावेळी इतर कैद्यांनी व बंद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली जोराने ओरडा सुरू झाला. मदतीसाठी सायरन वाजवण्यात आल. हा आवाज ऐकून कारागृह कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे पथकासह परिसरात दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर , स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. हल्ला करणाऱ्या कायद्याविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होते.

दरम्यान, शीणू शिंदे याने १४ डिसेंबर २०१९ रोजी विनेश राठोड या युवकाचा वाघापूर टेकडी परिसरात खून केला होता. त्या आरोपात तो कारागृहात आहे. कारागृहातील कुख्यात आरोपींना येरवडा व नागपूर कारागृहात पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने अशा बंद्यांची यादी तयार केली आहे.