काय सांगता ! होय, कैद्यानं गुप्तांगात लपवला मोबाईल, हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल

जोधपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून राजस्थानमधील एका कैद्याची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना समोर आली आहे. त्याची तब्येत ढासळताच त्याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात दवाखान्यात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याने त्याच्या खासगी भागात मोबाइल लपविला असल्याचे आढळले. यानंतर त्याला जोधपूरच्या मथुरादास माथूर रुग्णालयात नेण्यात आले.

प्रत्यक्षात जोधपूर मध्यवर्ती कारागृहातील एक दोषी कैदी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे तुरूंगात काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर दुपारी मुख्य कारागृहात परत आला आणि तिथेच त्याची तब्येत अचानक खालावली. प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तुरूंगात दवाखान्यात दाखल केले, तेथूनच त्याला जोधपूरच्या मथुरादास माथूर रूग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग शालामध्ये काम करत असताना, शिक्षा झालेल्या कैद्याने आपल्या खासगी भागात तीन मोबाईल ठेवले आणि त्याला हे मोबाईल मुख्य तुरूंगात घेऊन जायचे होते पण मुख्य कारागृहात प्रवेश घेतल्यानंतर तिन्ही मोबाईल कैद्याच्या गुप्तांगात अडकले आणि बाहेर काढता आले नाहीत यामुळे त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या मथुरादास माथूर रूग्णालयात कैद्याचे ऑपरेशन करुन मोबाईल बाहेर काढले जातील. असे सांगितले जात आहे की त्याना मोबाईल नेण्यात आणि कैद्यांना आतमध्ये देण्यास मोठी रक्कम मिळते, म्हणून तो खूप जोखीमवर काम करत होता.

ही बाब उघडकीस येताच जेल प्रशासनानेही यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. जेव्हा यासंदर्भात कैद्याला विचारणा केली गेली, तेव्हा त्याने फक्त पोटदुखी असल्याचे सांगत काहीही सांगण्यास नकार दिला.