बलात्कार, खून प्रकरणातील ‘त्या’ कैद्याला व्हायचंय तुरुंगाचा ‘पहारेकरी’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर मध्यवर्ती कारागृहात रात्रीचा पहारेकरी म्हणून नोकरी मिळावी, याकरिता एका जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याने नागपूर खंडपीठात अपील केले होते. न्यायालयाने त्या कैद्याच्या अर्जावर कायद्यानुसार विचार करण्याचे निर्देश देऊन संबंधित अपील निकाली काढले.

रवींद्र चौधरी असे या कैद्याचे नाव आहे. त्याला अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार व खून प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने १० वर्षांचा कारावास भोगला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील रात्रीच्या पहारेकरीपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी चौधरी यानेही अर्ज केला होता. चौधरीने केलेला अर्ज प्रशासनाकडून फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याच्या अर्जावर सुनावणी घेतली व कायद्यानुसार त्याचा विचार करुन निर्णय घेण्याचे आदेश तरुंग प्रशासनाला दिले आहेत.

Loading...
You might also like