Coronavirus : ‘या’ देशात कैद्यांवर होऊ शकतो ‘कोरोना’च्या लसीचा प्रयोग, मिळणार ‘बक्षीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. रशियामध्येही इतर देशांप्रमाणेच कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत रशियामध्ये कोरोनाची 3 लाख 53 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदविली गेली आहे. त्याच वेळी, 3633 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे समर्थन करणारे देशातील एक प्रख्यात नेते म्हणाले की, कोरोना विषाणूची लस कैद्यांवर वापरली जावी.

रशियाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे व्लादिमीर झिरिनोव्स्की म्हणाले की, कोरोना लसीचे काम वेगाने होण्यासाठी कैद्यांवर प्रयोग केले जावेत. त्यांनी म्हंटले की, लसीच्या प्रयोगाच्या बदल्यात गंभीर गुन्ह्यासाठी तुरूंगातील कैद्यांची शिक्षा अर्धी केली जावी. कारण आपल्याला मनुष्यांवरील चाचण्या वेगाने कराव्या लागतील. मी आपणास आश्वासन देतो की सध्या तुरूंगात असलेले लोक आनंदाने लसीची चाचणी करण्यासाठी तयार असतील, जर त्यांची शिक्षा अर्धवट केली गेली.

झिरिनोव्स्की लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत. हा रशियन संसदेत तिसरा मोठा पक्ष आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्ध्या शिक्षेची तरतूद केल्यास हजारो कैदी लसीच्या चाचणीत सामील होण्यासाठी स्वयंसेवक होतील. दरम्यान, दुसरीकडे व्लादिमीर झिरिनोव्स्की यांच्या प्रस्तावाला विरोधही केला जात आहे. कैद्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था रोसिया सिद्द्यश्चयाने म्हंटले कि- रशियामध्ये गुन्हेगारांना गुरांसारखे वापरण्याची प्रथा सामान्य आहे. रोसिया सिद्द्यश्चयाचे वकील अलेक्सि फेड्यारोव म्हणाले की, हे अश्याच तऱ्हेने आहे, जसे सोव्हिएत युनियनने अणुचाचणीच्या बाबतीत स्वत:च्या लोकांना एक्सपोस केले होते.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या मानवाधिकार समितीचे सदस्य अलेक्झांडर ब्रोड यांनी व्लादिमीर पुतीन यांना झिरिनोव्स्कीची योजना अंमलात आणू नये, अशी विनंती केली आहे. ते म्हणाले की, आमचे गुन्हेगार गिनी पिग नाहीत.