Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या स्वातंत्र्याच्या (India Independence Day) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. याचा एक भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी (Prisoners Release) देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) घेतला आहे. चांगली वर्तवणूक व इतर निकषांनुसार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) महाराष्ट्रातील 189 बंद्यांना विशेष माफी (Prisoners Release) देऊन त्यांची कारागृहातून मुक्तता केली जाणार आहे. अशी माहिती कारागृह प्रशासनाने गुरुवारी (दि.19) दिली.

15 ऑगस्ट 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 या काळातील बंदीवानांना विशेष माफी देऊन मुक्त (Prisoners Release) केले जाणार आहे. कैद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनावे यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या कैद्यांना मिळणार माफी

यासाठी संबंधित कैद्याचे कारागृहातील वर्तन चांगले असणे गरजेचे आहे.
ज्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी कैद्याचे वय 50 पेक्षा जास्त आहे, ज्यांनी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.70 टक्क्यांपेक्षा अधिक शारीरिक दृष्ट्या दिव्यांग कैद्यांनी निम्मी शिक्षा भोगलेली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेले बंदी, ज्या कैद्यांचा शिक्षेचा कालावधी संपलेला आहे. मात्र ज्यांना न्यायालयाने दिलेल्या दंडाची रक्कम भरता आली नाही, अशा कैद्यांना विशेष माफी (Special Apology) दिली जाणार आहे.

तसेच ज्या कैद्यांनी 18 चे 21 वर्षाच्या वयोगटात अपराध केला परंतु त्यानंतर कोणता अपराध न करता 50
टक्के शिक्षा भोगलेली आहे, अशा कैद्यांचा विशेष माफी कैद्यात समावेश करण्यात आला आहे.

गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष माफी अंतर्गत सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांना समाजात पुर्नवसन करण्यासाठी मार्गदर्शन सत्राचे
देखील आयोजन केले जाणार आहे.

Web Title :- Prisoners Release | 189 inmates to get exemption from jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची उडी, टिळक कुटुंबीय उतरल्यास निवडणूक बिनविरोध?