पृथ्वी शॉच्या कुटुंबाला मनसेकडून धमक्या, मनसेने आरोप फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पृथ्वी शॉ हा मुंबईच्या खेळाडू विंडीजविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे कौतूक होणे गरजेचे असताना दुर्दैवाने त्यावर राजकारण सुरू झाले आहे. पृथ्वी शॉ हा मूळचा बिहारचा खेळाडू असून, त्याने आपली खरी ओळख सांगू नये म्हणून मनसेकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप बिहारचे काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले असून मनसेने मात्र हा आरोप फेटाळला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b28dadd-cf6e-11e8-aba9-a72ce2809e29′]

गुजरातमध्ये बिहारी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न विचारला असता अखिलेश प्रसाद सिंह यांनी पृथ्वी शॉ चे उदाहरण दिले. पृथ्वी हा बिहारच्या गया जिल्ह्यातील मानपूरचा रहिवासी आहे. मात्र त्याला महाराष्ट्रात हे सांगू दिलं जात नाहीये. बिहारी असल्याचा उल्लेख केला तर खेळू देणार नाही अशी धमकी मनसेकडून पृथ्वीच्या परिवाराला दिली जात आहे, असे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटले आहे. खासदार अखिलेश प्रसाद सिंह हे काँग्रेसचे बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत.

[amazon_link asins=’B01F262EUU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a6f95e11-cf6f-11e8-8b4b-6ddc46bdf079′]

खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केलेल्या आरोपावर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. देशपांडे यांनी म्हटले की, आम्ही कोणालाही धमकी देण्याचे कारणच नाही. कोणही उपटसुंभ आमच्याबद्दल काहीही बोलेल. जर पृथ्वी शॉला धमकी मिळाली असेल तर तो किंवा त्याचे आई-वडील यावर काहीही बोलले नसताना ते बिहारच्या खासदाराला कसे समजले? या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पृथ्वीच्याच घरच्यांना विचारा, असे देशपांडे म्हणाले.

Loading...
You might also like