‘खिलाडी’ अक्षय आणि सोनू सूदचा ‘पृथ्वीराज’ सिनेमा रिलीजपूर्वीच सुपरडुपर हिट !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि सोनू सूद यांचा पृथ्वीराज हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चाहत्यांना सिनेमाची खूपच आतुरता आहे. हा सिनेमा आता रिलीजआधीच सुपरडुपर हिट मानला जात आहे. आधीपासून सर्वांना माहित होतं की, सिनेमात अक्षय कुमार आहे. परंतु आता सोनू सूदही सिनेमात आहे हे कळाल्यानंतर मात्र त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सोनूनं सतत लोकांची मदत केली आहे. अजूनही यात खंड पडलेला नाही. डॉक्टर्स, नर्स, पोलीस साऱ्यांसाठीच तो धावून आला. त्यानं किती तरी प्रवासी मजूरांना स्व खर्चानं घरी पोहोचवलं. या सगळ्यानंतर आता सोनूच्या भूमिकेची मात्र आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

https://twitter.com/ChalPakaMatt/status/1284342626510966794?s=20

आताच हा सिनेमा सुपरडुपर हिट मानला जात आहे. सोशलवरील चर्चा पाहता जाणकारही सांगत आहेत हा सिनेमा बक्कळ कमाई करेल. येणाऱ्या अनेक वर्षात सिनेमाचं रेकॉर्ड कोणी तोडणार नाही असंही त्याचं मत आहे.

https://twitter.com/Manish79399637/status/1284558045721157632?s=20

पृथ्वीराज सिनेमाबद्दल…
पृथ्वीराज सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा चव्हाण वंशातील हिंदू क्षत्रीय राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमाचा टीजरही रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात अक्षय कुमार पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यांची पत्नी संयोगिताची भूमिका मानुषी साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. द्विवेदी यांनी टेलिव्हिजन एपिक सीरीज चाणाक्य आणि 2003 साली आलेल्या पिंजर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.