Prithviraj Chavan । पहिले प्राधान्य महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे चालविण्याचे – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस (Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एका वृत्तपत्राशी बोलत असताना एक मोठं विधान त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रात भाजपचे (BJP) सरकार येऊ नये यासाठी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग जाणीवपूर्वक केला गेला. म्हणून हे सरकार 5 वर्षे चालविणे हे आमचे सर्वांचे पहिले प्राधान्य असल्याचं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटलं आहे. तर प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला आपला पक्ष वाढावा, तो अधिकाधिक संख्येने पुढे यावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या स्वबळाच्या भूमिकेकडे त्याच नजरेतून बघितले पाहिजे, त्यामधून वेगळे अर्थ काढणे चुकीचे असल्याचे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी त्यावेळी सांगितले आहे.

काही दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका ह्या स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय. याच मुद्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका विचारली असता, त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, प्रत्येक प्रदेशाध्यक्ष आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे ते कामच आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून तसाच अर्थ अभिप्रेत आहे. मात्र, निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही एकटेच स्वतंत्रपणे गेलो तर आम्हाला किती जागा मिळतील याचा देखील विचार केला पाहिजे. तसेच, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय त्यावर विचारले असता, त्यांनी यावर मला कोणतेही भाष्य करायचे नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पुढे चव्हाण म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढण्याची अनेक उदाहरणे आहेत.
याचा अर्थ नाही की, आमचे एकमेकांशी पटत नव्हते, मंत्रिमंडळात आम्ही एकत्र निर्णय घेत असू.
दरम्यान, ‘आम्ही नागपूरला आघाडी केली.
म्हणून तेथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस असतानाही आम्ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागा जिंकू शकलो.
महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीची आघाडी करून भाजपला पराभूत करावे लागेल.
तसेच, आताही अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुका लढवताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखावी लागणार आहे.
येत्या निवडणुकीत जो पक्ष अधिक जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे म्हटल्यास गैर ते काय?, असं देखील त्यांनी म्हटलं.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Prithviraj Chavan । First priority run grand alliance government statement Prithviraj Chavan leader of the Congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update