Prithviraj Chavan | ‘त्या’ 16 आमदारांना निलंबित करावेच लागेल – पृथ्वीराज चव्हाण

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात नवीन शिंदे फडणवीस सरकार स्थापन होताना पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्या 16 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाला निलंबित करावेच लागेल, असे मत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) कराड येथील आयोजित “भाजप हटाव, संविधान बचाव” रॅलीत बोलत होते.

 

देशातील संविधान आणि लोकशाहीवर घाला घालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू आहे. त्याला राज्यातील भाजप आणि शिंदे सरकारदेखील पाठिंबा देत आहे. त्याविरोधात राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या राजकारणात आणि कार्यकाळात देशातील स्वायत्त संस्था ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देशात कोणत्याही संस्थेला नि:पक्षपातीपणे काम करता येत नाही. महाराष्ट्रातील नवीन सरकारच्या वैधतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. हा कायदा राजीव गांधींनी 1985 मध्ये अमलात आणला होता. पुढे त्या कायद्यात 2003 साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात बदल करण्यात आले. राज्यात 23 मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या केवळ 20 मंत्री काम करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे सरकारच मुळी बेकायदेशीर आहे, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

जून महिन्यात शिवसेनेत बंड झाले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री आणि बंडाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासह इतर 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती.
या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
त्यामुळे या 16 आमदारांच्या अपात्रतेवर न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Prithviraj Chavan | 16 mla should be suspended says congress leader prithviraj chavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Swati Deval | ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘या’ अभिनेत्रीची सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत दिली माहिती

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी