Prithviraj Chavan | ‘मी बरंच सहन केलंय, शरद पवार…’, पवारांच्या खोचक टीकेला पृथ्वीराज चव्हाणांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. या सर्व घडामोडीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत असताना शरद पवार आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. साताऱ्यात बोलताना शरद पवार यांनी केलेल्या खोचक टीकेला पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वादाला कुठून सुरुवात झाली?

शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या वदाला पवारांच्या राजीनाम्यानंतरच्या चर्चांनी सुरुवात झाली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीचा भाजपबरोबर प्लॅन बी सुरु आहे. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले होते. चव्हाण यांच्या या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना खोचक टीका केली होती.

काय म्हणाले शरद पवार?

साताऱ्यात पत्रकार परिषदेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानासंदर्भात शरद पवार यांना विचारण्यात आले.
यावर बोलताना त्यांनी सूचक विधान केलं. त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे… ते ए, बी,सी किंवा डी
आहेत ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की त्यांची कॅटेगरी कोणती आहे,
तर ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे सांगणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या टीकेला चव्हाणांचे प्रत्युत्तर

शरद पवार यांनी केलेल्या खोचक टीकेवर प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते बलले तरी मला त्याचं काही वाटत नाही. मी बरंच काही सहन केलेलं आहे. शरद पवारांना वडिलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार आहे, असं चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मजबूत व्हावी. कुणीतरी मंत्री व्हावं, कुणालातरी पद मिळावं
यासाठी महाविकास आघाडी झालेली नाही. भाजपाचा (BJP) विषारी विस्तार थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो
आहोत. या प्रयत्नांना कुणीही अपशकुन करु नये, अशी माझी प्रामाणिक भावना असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Web Title :- Prithviraj Chavan | Congress leader prithviraj chavan reacts on sharad pawar targeting grade in congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

Pune – G20 Summit | पुणे : जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न