Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला धरले जबाबदार, म्हणाले – ‘भाजप सरकार सत्तेवर यायला कोण…’

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – Prithviraj Chavan | राज्यात सन 2014 मध्ये आघाडी सरकारचे काम चांगले होते. परंतु या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सत्ता आणि आघाडीपासून अचानक दूर झाली. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते, असे मत काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले. ते कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत हे सगळ्यांना समजले

काँग्रेसबाबत माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडल्यामुळे जी-23 चा मुख्य हेतू सफल झाला. पण, निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेले. काँग्रेसमध्ये 22 वर्षांनंतर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. तशी आमची मागणी होती. आम्ही ती लावून धरली नसती तर कदाचित अजूनही अशा निवडणुका झाल्या नसत्या.

चव्हाण म्हणाले, नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) चांगले काम करतील.
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), गुजरात (Gujarat) राज्यांच्या निवडणुकांसह येत्या
लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections) काँग्रेस नियोजनाने सामोरे जाईल.
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेबाबत ते म्हणाले, राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’
(Bharat Jodo Yatra) म्हणजे ‘मोदी हटाव यात्रा’ आहे.
मोदी पंतप्रधानपदावर असेपर्यंत देशात दूषित वातावरण राहणार असल्याने बदलाची गरज आहे.
त्यामुळे काँग्रेसला येत्या निवडणुका जिंकाव्याच लागतील.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar),
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) त्यात सहभागी होणार का?
या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, त्यांना निमंत्रण दिले गेले आहे. ही यात्रा तिरंगा झेंड्याखाली होत आहे.
पण यात सहभागी व्हायचे की नाही हा त्यांचाच निर्णय असेल.

Web Title :-  Prithviraj Chavan | ncp responsible bjp coming to power in the state prithviraj chavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 3 पोलिस पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Cyber Intelligence Unit in Maharashtra | ‘महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार’ – देवेंद्र फडणवीस