Prithviraj Chavan On PM Narendra Modi | मोदींना पराभवाचा अंदाज आलाय, म्हणूनच जीभ घसरतेय, पृथ्वीराज चव्हाणांची टीका, ‘वंचित’बाबत म्हणाले…

सोलापूर : Prithviraj Chavan On PM Narendra Modi | काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे आज प्रचारासाठी सोलापुरात (Solapur) आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले, तसेच यावेळी भाजपाविरोधी मतांची विभागणी टाळण्यात इंडिया आघाडी (INDIA Aghadi) यशस्वी झाल्याचा दावा केला. वंचितबाबत Vanchit Bahujan Aghadi (VBA) बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितने जागावाटपाच्या चर्चेत दुय्यम फळीतील नेते पाठवले, त्यांची भाषा अपमानास्पद होती, असा आरोप देखील केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकांच्या (Solapur Lok Sabha) पहिल्या टप्प्यात मतदानाचे आकडे खाली आल्यामुळे सर्व काही ठीक नाही, अशा अपयशाचा अंदाज आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीभ घसरली आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचे विकासाचे मुद्दे सोडून द्वेषाचे, भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे.

मतविभागणीचे गणित मांडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सोलापुरात लोकसभेच्या प्रचारासाठी आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी, देशात भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत आहे. २०१४ पूर्वी देशात भाजपला २०-२२ टक्क्यांवार मते मिळत नव्हती.

२०१४ साली त्यांना ३१ टक्के मिळाली होती. नंतर २०१९ साली पुलवामा घटनेच्या पाश्र्वभूमीवर भाजपला ३७ टक्के मते मिळाली.
आता ती ३० टक्क्यांपर्यंत दिसतात.
विरोधकांच्या मतांमध्ये म्हणजेच भाजपविरोधी (BJP) मतांमध्ये विभागणी होत गेल्याने भाजापला सत्ता मिळत गेली.
आता ही मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.

वंचितसोबत जागावाटपाच्या फिसकटलेल्या चर्चेबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीबरोबर घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला.
परंतु वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर चर्चेस न येता दुय्यम फळीतील नेत्यांना पाठविले गेले आणि या दुय्यम फळीतील नेत्यांची भाषा अपमानास्पद होती.
जागा वाटपात त्यांच्या अव्यवहार्य मागण्या मान्य करणे शक्य नव्हते, असा आरोप चव्हाण यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २०१९ साली लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र असताना
त्यांना ७ टक्के मते मिळाली होती.
त्यावेळी सोलापूरसह सात लोकसभा जागांवर भाजपविरोधी मतविभागणीचा महाविकास आघाडीला फटका बसला होता.
परंतु आता त्यांच्यासोबत एमआयएम नसल्याने वंचितच्या मतांचा टक्का तीनपर्यंत खाली येऊ शकतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू