Prithviraj Chavan | ‘घाईगडबडीमध्ये राजीनामा देवून उध्दव ठाकरेंनी फार मोठी चुक केली’ – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Prithviraj Chavan | शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या (Shivsena Rebel MLA) अपात्रते सोबत इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) एकत्रित सुनावणी पार पडली. यात न्यायालयाने दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्यासाठी 29 जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच या प्रकरणावर पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांनी घाईगडबडीमध्ये राजीनामा (Resignation) दिला, ही फार मोठी चूक केली आहे. विधिमंडळामध्ये जाऊन त्यांनी भाषण केलं पाहिजे होतं. आपलं मत काय, काय परिस्थिती झाली, काय आरोप झाले, हे सर्व अधिकृतपणे सदनामध्ये सांगायला पाहिजे होतं, असं चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

 

उद्धव ठकरेंनी राजीनामा दिला नसता तर…
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर बहुमत (Majority) सिद्ध करण्यास सांगितल्यावर फुटलेल्या आमदारांनी विरोधात मतदान केलं असतं.
मग अँटी डिफेक्शन लॉ-परिशिष्ट 10 (Anti-Defection Law-Schedule 10) लागू झाले असते.
ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान केलं, ते सगळे अपात्र ठरले असते. पण तसं घडलं नाही.
तलवार आधीच म्यान करण्यात आली. त्यामुळे राज्यपालांनी मग पुढे लार्जेस्ट मेजॉरिटी पार्टी (Largest Majority Party) होती,
त्याला निमंत्रण दिलं. त्यामुळे माझ्या मते सध्या हे प्रकरण इंटरेस्टिंग झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट आता राज्यघटनेचा कसं सुसंगत अर्थ लावतो,
हे देखील बघितलं पाहिजे, असे मत ज्येष्ठ वकील उज्जवल निकम (Senior Advocate Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केले.

 

Web Title :- Prithviraj Chavan | uddhav thackeray resigned of chief minister is a big mistake congress leader prithviraj chavan

  
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

RBI Digital Currency | देशात लवकरच सुरू होणार डिजिटल करन्सी, घाऊक आणि किरकोळ क्षेत्रासाठी टप्प्याटप्प्याने होत आहे काम

 

Pune News | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांना करिअर मार्गदर्शन

 

Work From Home New Rule | WFH बाबत आला सरकारचा नवीन नियम, 50% कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये येणे आवश्यक