मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी राजीनामा (Resignation) दिला नसता, तर आम्ही पूर्वस्थिती लागू करुन सरकार पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) वाचलं आहे. मात्र, सरकार वाचलं असलं तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधत होते.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) पुढे म्हणाले, निलंबनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. कालबद्ध पद्धतीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. निलंबनाचा निर्णय न्यायालयाने न घेतल्याने प्रथम दर्शनी हे सरकार वाचले आहे, असे म्हणायला हरकत नाही. ज्याअर्थी संवैधानिक पदावर असलेल्या राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे, यावरुन हे सरकार बेकायदा पद्धतीने अस्तित्वात आले आहे, असं स्पष्ट निर्देश न्यायालयाच्या निकालातून दिसून येते असे चव्हाण म्हणाले.
ज्या प्रकारे एकनाथ शिंदे सरकार (Eknath Shinde Government) अस्तित्वात आले, त्यानंतर जो घोडाबाजार झाला,
हे पाहता सरकार बेकायदा, असंवैधानिक (Unconstitutional) आहे.
यासाठी पुढची न्यायालयीन कारवाई निश्चित केली जाईल.
माझी या ठिकाणी मागणी आहे की, इतकी गंभीर ताशेरे संवैधानिक पदावर बसलेल्या लोकांवर ओढले आहेत.
ही अतिशय गंभीर बाब आहे. न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर
शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा दिला पाहिजे आणि नवं सरकार राज्यात गठन केलं पाहिजे,
अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
Web Title :- Prithviraj Chavan | why did congress leader prithviraj chavan say still on moral grounds the government should immediately resign and after the supreme court verdict
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर