दिल्लीतील बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील राजकारणातील राजकीय वादळ अखेर शमताना दिसत आहे. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची चर्चा सुरु होती ती संपली आहे त्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा झाली, ही चर्चा सकारात्मक झाली आहे. चर्चा अजूनही सुरु आहे. पुढील 1 ते 2 दिवस आणखी चर्चा होईल. लवकरच राज्यात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यात सत्तेचा तिढा मिटवण्यासाठी आज आघाडीची बैठक झाली. लवकरात लवकर राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल. यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, सकारात्मक चर्चा झाली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. आम्ही लवकर राज्याला स्थिर सरकार देऊ.

किमान समान कार्यक्रमावर या बैठकीत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे परंतू याचे अधिकृत वृत्त अजून आले नाही.

तीन तास काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी खलबतं सुरु होती. यावेळी दोन्ही पक्षांचे पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक, प्रफुल पटेल, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते.

Visit :  Policenama.com