विश्वजीत कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख सामना रंगणार?

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या ठिकाणी पोटनिवडणूक होत असून, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम गरुवारी जाहीर झाला आहे. या मतदारसंघातून भजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख १० मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र अधिकृत घोषणा बुधवारी (दि.९) होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस- भाजपमध्ये लढत होणार हे निश्चित झाले आहे.

निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्ह्यात गुरुवार पासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी दि. 28 मे रोजी मतदान, तर दि. 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने देशातील चार लोकसभा आणि दहा राज्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यात पलूस-कडेगाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.