नॅशनल पेन्शन सिस्टमला स्विकारताहेत खाजगी कंपन्या, जाणून घ्या कसे उघडू शकता NPS अकाऊंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल पेन्शन सिस्टमची व्याप्ती हळूहळू वाढत आहे आणि यामध्ये खासगी कंपन्यांची आवडही वाढत आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण खासगी कंपन्यांना एनपीएसमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.
बंडोपाध्याय यांनी वेबिनारमध्ये म्हटले आहे की, कंपन्यांनी एनपीएस योजना स्वीकारल्यास त्याचा फायदा त्यांच्या कर्मचार्यांना होईल. कॉर्पोरेट क्षेत्रात नॅशनल पेन्शन सिस्टमची व्याप्ती वाढवण्याला खूप वाव आहे. आतापर्यंत 8,000 कंपन्यांनी एनपीएसकडे नोंदणी केली आहे. पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजनेत (एपीवाय) एकूण मालमत्ता 5.05 लाख कोटींच्या पुढे गेली आहेत.
एनपीएस म्हणजे काय
एनपीएस ही एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे, ही केंद्र सरकारने 2004 साली सुरू केली होती. 2009 पासून ही योजना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी देखील उघडली गेली आहे.
आता कागदपत्रे न देता घरी एनपीएस खाते उघडा
अलीकडेच पीएफआरडीएने एनपीएससाठी वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) ऑनबोर्डिंग सुविधा सुरू केली आहे. एका निवेदनात पीएफआरडीएने म्हटले आहे की, “डिजिटल सोल्यूशन देण्याच्या प्रयत्नात पीएफआरडीए पेपरलेस पद्धतीने ई-स्वाक्षरीद्वारे ऑनलाईन एनपीएस खाते उघडण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून देत आहे.”
एनपीएस खाते उघडण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी पीएफआरडीएने आता ग्राहकांना वन टाईम पासवर्ड (ओटीपी) च्या माध्यमातून एपीएस खाते उघडण्याची परवानगी दिली आहे. या प्रक्रियेमध्ये, बँकांचे ग्राहक ज्यांना संबंधित बँकांच्या इंटरनेट बँकिंगद्वारे एनपीएस खाते उघडण्याची इच्छा आहे, त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपीचा वापर करून अशी खाती उघडू शकतात.