नोकरदारांसाठी मोठी बातमी ! ‘ही’ कागदपत्र जमा न केल्यास पगाराला लागणार ‘कात्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे कर्मचारी खासगी कंपनीत काम करतात त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आता ज्या कर्मचाऱ्यांचा पगार आयकराच्या चौकटीत बसतो त्या कर्मचाऱ्यांना आपल्या गुंतवणूकीचे पुरावे द्यावे लागणार आहेत. डिसेंबर ते मार्च या काळात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकीची कागदपत्रे मागवून घेतात. परंतू अनेक कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नसते आणि ते त्यांचा पगार घालवून बसतात.

कागदपत्रं का जमा कराल
कंपनी मार्च महिन्यांच्या आधी तुमच्याकडे मागच्या महिन्यात केलेल्या गुंतवणूकीचे पुरावे मागते. कर वाचवण्यासाठी आपण केलेल्या गुंतवणूकीची या कागदपत्राद्वारे पडताळणी केली जाते. त्यामुळे कर कमी द्यायचा की जास्त याबाबत कोणताही गोंधळ राहत नाही. कंपनी दरमहा तुमच्या पगारातील कराची रक्कम कापून घेते, परंतू गुंतवणूकीची कागदपत्रं जमा केल्यास तुम्हाला आयकरात सवलत मिळते.

तुमच्याकडे लाइफ किंवा हेल्थ पॉलिसी असेल तर त्याच्या प्रिमियमची पावती द्यावी लागेल. हेल्थ पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही कुटूंबातील सदस्यावर रुग्णालयात उपचार केले तर त्याचे ही बिल द्यावे लागेल. हेल्थ चेकअप केल्याची पावती देखील तुम्ही जोडू शकतात.

पुरावे म्हणून ही कागदपत्र
नॅशनल पेन्शन स्कीम, म्यूचुअल फंड, पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग स्कीम या पैसे गुंतवले असतील तर आयकर वाचवण्यासाठी ही कागदपत्रं देता येतात. करात सूट मिळण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतल्याची परतफेड केल्याची पावती देऊ शकतात. तसेच मुलांच्या शाळेची फी भरल्याची सत्य प्रत, तसेच भाड्याच्या घरात राहत असाल तरी देखील करात सूट मिळते.

Visit : policenama.com