मोदी २.० सरकारचा मोठा निर्णय ; संयुक्त सचिव पदानंतर आता केंद्रात ‘ही’ महत्वाची सरकारी पदे खासगी क्षेत्रातून भरणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रात उपसचिव आणि संचालकांची पदे खासगी क्षेत्रातून भरण्याची केंद्र सरकारची योजना आहे. प्रारंभी असे एकूण ४० अधिकारी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. (IAS) गट-अ केंद्रीय सचिवालय सेवेत बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांतून भरली जातात. याबाबत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचे अर्ज मागवणारी जाहिरात लवकरच दिली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीती आयोगाने तयार केलेल्या अहवालानुसार व्यवस्थेमध्ये तज्ज्ञांना ठराविक मुदतीसाठी सामावून घेणे गरजेचे आहे असे म्हंटले होते. त्यामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर उपसचिव ते संयुक्त सचिव या पदांवर नीती आयोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार आता उपसचिव आणि संचालकांची पदे भरली जणार आहेत.

यापूर्वी संयुक्त सचिव (Joint Secretary) पदासाठी खासगी क्षेत्रातील नऊ तज्ज्ञांची निवड केली होती. त्यासाठी तब्बल ६ हजार अर्ज आले होते. Joint Secretary पद भारतीय शासन सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) व सरकारच्या इतर सेवांमधून भरले जाते.

उपसचिव आणि संचालकांची पदे खासगी क्षेत्रातून भरण्यासाठी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव सी. चंद्रमौली यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपसचिव आणि संचालक या पातळीवर तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!