देशात धावणार 44 नवीन वंदे भारत टे्रन्स, जाणून घ्या तिकीट दर आणि कोणत्या मार्गावर चालणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आता दिल्लीहून मुंबई आणि कोलकातापर्यंत रात्रीच्या प्रवासाला जाता येऊ शकते. भारतीय रेल्वे लवकरच ४४ नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जुलै महिन्यात ४४ नवीन वंदे भारत गाड्यांची निविदा प्रसिद्ध केली जाईल. ते म्हणाले, दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता दरम्यानचा प्रवास रात्रीत रुपांतर करायचा आहे. म्हणून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, खासगी कंपन्यांना निश्चित Haulage शुल्क भरावे लागेल. तसेच खाजगी कंपनी लिलावा दरम्यान एकूण मिळकतीतील मोठा वाटा रेल्वेला देईल. त्यांना प्राधान्य दिले जाईल. खासगी कंपनीला ९५ टक्के पंक्चुऍलिटी फॉलो न केल्याबद्दल दंड आकारला जाईल. ड्रायव्हर्स आणि गार्ड भारतीय रेल्वेचेच असतील.

या मार्गावर धावतील खाजगी गाड्या

खासगी गाड्यांसाठी १२ क्लस्टरची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण देश व्यापण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पहिल्या क्लस्टर्समध्ये चंडीगड, बेंगलुरू, हावडा, मुंबई आणि दुसऱ्या क्लस्टर्समध्ये पटना, प्रयागराज, सिकंदराबाद यांचा समावेश आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, एप्रिल २०२३ पर्यंत खासगी रेल्वेगाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. मेक इन इंडिया पॉलिसीअंतर्गत सर्व डबे खरेदी केले जातील.