‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियर आहे ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी खूप कमी वेळात प्रकाशझोतात आलेली आणि अनेकांच्या मनावर राज्य करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत स्टार झाली होती. ओरू अडार लव या सिनेमातील मानिका मलयारा पूवी या गाण्याची एक क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. यानंतर प्रियाचे लाखो चाहते झाले. तिच्या अदांचे अनेकजण दीवाने झाले. प्रियाचं व्हिडीओ इकतं व्हायरल झालं की, एका दिवसांत तिचे फॉलोवर्स 6 लाखांहून अधिक झाले. प्रिया जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनली होती. आपल्या दिलखेच अदांनी घायाळ करणारी विंक गर्ल आता पुन्हा चर्चेत आली आहे. याला खास कारणही आहे. प्रिया ओरू अडार लव मधील तिचा सहकलाकार रोशन अब्दुल रहुफसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु असल्याचं दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BwkXnUfHu3E/?utm_source=ig_embed

प्रियाने अलीकडेच रोशनच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशलवर पोस्ट केले आहे. या फोटोने दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. या फोटोसाठी प्रियाने खास कॅप्शन देत प्रेम, बाँडिंग याबद्दल भली मोठी पोस्ट लिहिली आहे. कॅप्शनमध्ये तिने हॅप्पी बर्थ डे ओशा असंही लिहिलं आहे.

https://www.instagram.com/p/BwkXXxJHk7S/?utm_source=ig_embed

प्रियाने शेअर केलेला रोशनसोबतचा फोटो एक कँडिड क्लिक आहे. हा फोटोही त्या दोघांबद्दल बरेच काही सांगून जातो. प्रिया आणि रोशन यांनी मात्र त्यांच्या नात्याला घेऊन अधिकृतपणे काही सांगितले नाही. परंतु सोशलवर मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चेला मात्र पूर आला आहे.

https://www.instagram.com/p/BwkWczXHTc2/?utm_source=ig_embed