प्रिया प्रकाश वारियरचं ‘लाडी लाडी’ गाणं रिलीज ! चाहत्यांना आवडला ‘विंक गर्ल’चा जबरदस्त डान्स (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘विंक गर्ल’ आणि साऊथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिचा एक भुवई उडवातानाचा व्हिडीओ समोर आला आणि ती रातोरात स्टार झाली. पहिला मल्याळम सिनेमा ओरू अडार लव (Oru Adaar Love) सिनेमातील गाणं मानिक्य मलाराया पूवी मध्ये तिनं उडवलेल्या भुवईच्या काही सेकंदाच्या व्हिडीओनंच तिला मोठी स्टार बनवलं होतं. प्रिया आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. पुन्हा एकदा तिनं आपल्या साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या प्रियाचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

मकरसंक्रांतीच्या निमित्तानं प्रियाचं नवीन म्युझिक व्हिडीओ रिलीज झालं आहे. या व्हिडीओत तेलगू गाण्यात प्रिया जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. लाडी लाडी असं या गाण्याचं नाव आहे.

प्रियानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर करूनही हे गाणं रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. गाण्यात प्रिया आणि रोहित नंदन दिसत आहेत. राहुल सिपलिगंज आणि प्रिया प्रकाश वारियर यांनी हे गाणं गायलं आहे. किट्टू विसारपरागडा यांनी हे गाणं लिहिलं आहे. श्री चरण पकालाचं गाण्याला म्युझिक आहे.

प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा ओरू अडार लव हा एक रोमँटीक ड्रामा होता. हा सिनेमा लुलु यांनी डायेरक्ट केला होता. यात सियाद शाजान, रोशन अब्दुल रहूफ आणि नूरिन शेरिफ यांनी काम केलं होतं. हा सिनेमा कन्नड आणि तेलगुमध्येही डब केला होता. याशिवाय प्रिया लवकरच श्रीदेवी बंगलो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. याशिवाय ती लव हॅकर्स या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.