प्रियकराच्या लग्नात प्रेयसीची ‘एन्ट्री’, सनई चौघड्याच्या सुरात नवरदेवाची ‘धुलाई’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – (माधव मेकेवाड) – सनई चौघड्याच्या सुरात नवरदेवाची वरात लग्न मंडपात आली. दोन्हीकडच्यांनी आहेराची देवाणघेवाण केली. सर्वत्र आनंदी वातावरण होते. मंडपात अक्षदा वाटण्यात आल्या होत्या. प्रत्येकजण नवरदेव कधी बोहल्यावर चढतो याची वाट पहात होता. नवरदेव आला बोहल्यावर चढणार तोच नवरदेवाच्या प्रेयसीची एन्ट्री लग्न मंडपात झाली आणि नवरदेवाचे बिंग फुटले. नवरदेवाचे लग्ना आगोदर दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचे समजता संतप्त नवरीमुलीकडच्यांनी नवरेदवाची यथेच्छ धुलाई केली.

कळमनुरी तालुक्यातील दांडेगावच्या अरविंद जगदेवराव साखरे याचा विवाह प्रिया (नाव बदलले आहे) हिच्या सोबत शनिवारी सकाळी ११ वाजून ५१ मिनीटांनी होणार होता. हा समारंभ नांदेड शहरातील कौठा भागातील एका मंगलकार्य़ालयात होता. दोन्हीकडच्या पाहुण्यांनी लग्नाची जय्यत तयारी केली होती. काही वेळातच अरविंद हा बोहल्यावर चढणार होता.

सर्वानाच त्याची उत्सुकता लागली होती. अरविंद बोहल्यावर चढणार तोच त्याची प्रेयसी माया (नाव बदलले आहे. मंडपात आली आणि तिने अरविंदचे आणि माझे एकमेकांवर प्रेम होते तसेच आम्ही लग्न केले असल्याचा धक्कादयक खुलासा जमलेल्या सर्व पाहुण्यांसमोर केला. अरविंदच्या घरच्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने प्रेमाची कबुली दिली मात्र लग्न केले नसल्याचे सांगितले. त्याच्या कबुलीमुळे संतप्त झालेल्या नवरी मुलीकडच्यांनी अरविंदची यथेच्छ धुलाई करण्यास सुरुवात केली.

हा प्रकारची वार्ता काही क्षणात परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले़. फसवणुक करणारा नवरदेव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच मंडपात नववधूचा दुसऱ्या युवकाशी विवाह दरम्यान, नियोजित वर अरविंद जगदेवराव साखरे याच्याकडून फसवणुक झाल्यानंतर नववधूचे कुटुंबिय काळजीत पडले होते. नववधूचे पित्याचे छत्र हरविले असून आईनेच शेती विकून तिच्या लग्नाची तयारी केली होती. त्यामुळे आता नववधूचे कसे? या विवंचनेत सर्व जण होते. तोच नववधूच्या नातेवाईकापैकीच एका मुलाने प्रिया हिच्याशी लग्नास होकार दिला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता प्रियाचा त्या मुलाशी विवाह लावून देण्यात आला. हा विवाह जुळावा यासाठी परिसरातील अनेकांनी प्रयत्न केले.

सिने जगत –

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like