फ्रान्स सरकारकडून भारताचा शेफ प्रियम चॅटर्जीला मानाचा ‘ऑर्डर ऑफ अ‍ॅग्रीकल्चर मेरीट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय शेफ प्रियम चॅटर्जीला फ्रान्सच्या सरकारकडून ऑर्डर ऑफ अ‍ॅग्रीकल्चर मेरीट पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. पारंपरिक भारतीय आणि फ्रेंच पदार्थांचे पुनरुज्जीवनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याला पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांड्रे झिगलर यांनी सोमवारी (ता.१२) फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार दिला.

फ्रेंच सरकारकडून कृषी, खाद्यउद्योग आणि पाककला क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. प्रियम मुळचा पश्चिम बंगालचा आहे. बंगालमधील पारंपरिक पदार्थांसह फ्रेंच पदार्थ बनविणे त्याची खासियत आहे. मिळालेल्या पुरस्काराबद्दल तो म्हणाला, की माझ्या पाक कौशल्याचे श्रेय माझे कुटुंब आणि फ्रान्सला आहे. लहानपणापासून घरातील खाद्यपदार्थांची आवड असणारे आणि कलाकार लोकही आहेत. त्यामुळे तेव्हापासूनच जेवण बनविणे, ते आकर्षक पद्धतीने सजविणे याचे संस्कार घडले आहेत. हैदराबादमध्ये पार्क हयात हॉटेलमध्ये पहिल्यांदा माझी शेफ म्हणून निवड झाली. तेथे फ्रेंच शेफ जीन क्लॉड यांच्याशी भेट झाल्यानतंर त्यांनी फ्रेंच पदार्थाचे प्रशिक्षण दिले. क्लॉड यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे मी फ्रेंच पदार्थांच्या प्रेमात पडलो.

https://twitter.com/myfoodyourplate/status/1161129547040874496

प्रियम आता फ्रान्समधील नैकेतील जान रेस्टॉरंटमध्ये कार्यरत असून त्याने यापुर्वी मेहरॉलीतील दोन मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मुख्य शेफ म्हणून काम केले आहे. पाककलेसोबत त्याला संगीतामध्येही रस आहे. त्याच्या या गोष्टींची दखल घेत फ्रेंच दुतावासाने त्याला या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –