खरंच की काय ! कॅटरीना करणार ‘दबंग’ सलमान खानशी लग्न ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा ट्रेंड सुरु आहे. असं म्हणण्यास हरकत नाही. प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोण यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ लग्न करणार आहे. कॅटरीना कैफ नुकतीच सलमानच्या भारत सिनेमात झळकल्याचे दिसून आले. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. चाहत्यांना सलमान आणि कॅटची केमिस्ट्री आवडली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कॅटच्या भारत सिनेमाची चर्चा तर आहेच. परंतु तिच्या लग्नामुळे सध्या कॅट चर्चेत आल्याचे दिसत आहे. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, कॅटरीना कैफ लवकरच लग्न करणार आहे. कॅटच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचे झाले तर, तिचे नाव सलमान खान आणि रणबीर कपूर सोबत मोठ्या कालावधीसाठी जोडले गेले आहे. रणबीर आणि कॅटचं रिलेशन खूप काळ चाललं. परंतु त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं त्यानंतर दोघांनीही आपलं नातं संपवलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, आता पुन्हा एकदा कॅटरीनाचं मन सलमान खानवर आलं आहे. दोघेही सध्या भेटीगाठी करताना दिसत आहे. सलमान आणि कॅटमधील जवळीक वाढताना दिसत आहे. अनेक लहान सहान गोष्टींवर एकमेकांची गळाभेट घ्यायची एकमेकांना हग करायचं. या सगळ्या गोष्टी त्यांच्यातील वाढती जवळीकता सांगत आहेत. वृत्तांनुसार, दोघेही 2019 मध्ये लग्न करण्याची दाट शक्यता आहे. खरेतर या गोष्टीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु अनेक अशा प्रकारचे वृत्त समोर येत आहेत ज्यातून हे घडण्याची दाट शक्यता वाटत आहे.

सिने जगत –

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

 

आरोग्यविषयक वृत्त

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

#YogaDay2019 : ‘या’ आसनाने स्वभावात होतात सकारात्मक बदल

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

You might also like