‘न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी’ : प्रियंका चतुर्वेदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुख्यात गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. आठवडयाभरापासून फरार असलेल्या दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात अटक करण्यात आली होती. त्याला उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आज कानपूरला घेऊन येत असताना ताफ्यातील एक वाहन पलटी झाले. त्यानंतर दुबे पोलिसाचे शस्त्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल यूपी एसटीएफने केलेल्या कारवाईत विकास दुबे ठार झाला.

त्यानंतर राज्यसभेतील खासदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी या एन्काऊंटरसंबंधी ट्विट केले आहे. ‘न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी’ असे चर्तेुवेदी यांनी म्हटले आहे.
एन्काऊंटरसंबंधी पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी या एन्काऊंटरसंबंधी ट्विट केले आहे.