कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियंका चतुर्वेदींचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन निवडणूकीत कॉंग्रेसला धक्का बसला आहे. नाराज असलेल्या कॉंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवबंधनात अडकल्या आहेत. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. १० वर्ष कॉंग्रेसमध्ये निस्वार्थपणे काम केले. परंतु काही गेरवर्तनामुळे मी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली असल्याचे सांगत त्यांनी यापुढे शिवसेनेचे काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या ८ जणांना कॉंग्रेसमध्ये परत घेतल्याने काँग्रेसमध्ये गुंडांना स्थान दिल जातं असं म्हणत दोन दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला. आज त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

यावेळी त्या म्हणाल्या, मी मुंबईत राहते. २६/११ ची घटना झाली तेव्हा खुप खेद झाला होता. मागील १०वर्ष खुप प्रभावशाली काम केलं. महिलांचे मुद्दे मी मजबुतीने मांडू शकत होते. त्यावेळी माझ्या बिनधास्तपणे बोलण्यावरून मला सोशल मिडीयावरही मला ट्रोल केलं जात होतं. परंतु कॉंग्रेसमध्ये माझ्याशी गैरवर्तन करणाऱ्यांना परत घेण्यात आलं. त्यांना आणल्याने मी नाराज झाले आहे. त्यामुळेच मी कॉंग्रेस सोडली. मी महिलांच्या आत्मसन्मानासाठी लढते. मी महिलांना काय उत्तर देऊ. माझी जबबादारी महिलांप्रती आहे. त्यामुळे त्यांच्या मुद्द्यांवर मला काम करता येते म्हणून मी शिवसेनेत दाखल झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like