Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Priyanka Chaturvedi | शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह याबाबतची महत्वपूर्ण सुनावणी निवडणुक आयोगासमोर आज होणार आहे. याबाबतचा लेखी युक्तीवाद शिवसेनेच्या दोन्ही गटांना सादर करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटावर व केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.

 

यावेळी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘शिवसेना (Shivsena) पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल. पक्षाचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी, निवडणूक आयोगाकडे (ECI) सर्वाधिक प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. तरीही शिंदे गट एका रात्रीत म्हणत असेल आम्ही शिवसेना आहे, तर ते पैसा आणि सत्तेच्या जोरावर बोलत आहेत. मात्र, जनता, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही ते निवडणूक आयोगासमोर सिद्धही केलं आहे. त्यामुळे संविधानानुसार निर्णय झाला तर हा निर्णय आमच्याच बाजुने लागेल.’ असा विश्वास यावेळी बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केला.

 

यादरम्यान बोलताना त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर देखील जोरदार टीका केली. त्या (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, ‘शिंदे गटाचे आमदार आणि खासदार शिवसेनेच्या चिन्हावर जिंकून आले आहेत. त्यानंतर हे लोकं जर एखादा गट निर्माण करत असेल, तर हा गट अमान्य आहे. मुळात त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा देऊन स्वत:च्या हिंमतीवर लढून दाखवावं. हा एकप्रकारे राज्यातील मतदारांशी केलेला विश्वासघात आहे. आगामी निवडणुकीत जनताच यांना धडा शिकवेल.’ असा हल्लाबोल त्यांनी शिंदे गटावर केला.

तर त्यांनी यावेळी बोलताना मोदी सरकारवर (Modi Government) देखील जोरदार टीका केली.
त्या म्हणाल्या, ‘शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा निकाल आतापर्यंत यायला हवा होता.
मात्र, हा निर्णय जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात येत आहे.
कारण निवडणूक आयोगावर मोदी सरकारचा दबाव आहे.
खरं तर निवडणूक आयोगच नाही, तर ईडी असेल किंवा सीबीआय असेल,
आदी संस्थांवर मोदी सरकारचा दबाव आहे.’
असे म्हणत त्यांनी मोदी सरकार चांगलाच निशाणा साधला.

 

 

Web Title :- Priyanka Chaturvedi | priyanka chaturvedi criticized shinde group and
modi government on election commission hearing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा