Priyanka Chaturvedi | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा ! उपराष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली खंत; सांसद टीव्हीचे अँकरपद सोडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सांसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळावरुन शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), तृणमूल (Trinamool) आणि डाव्या पक्षांच्या 12 खासदारांचं निलंबन (12 MP Suspended) करण्यात आले. यामध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांचा देखील समावेश आहे. संसदेतून निलंबित झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मोदी सरकारवर (Modi government) तोफ डागली होती. गुन्हेगारांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळते. पण आम्हाला ती देखील मिळत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

 

यानंतर आता प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांच्याकडे राजीनामा (resign) पाठवून दिला आहे. चतुर्वेदी यांनी सांसद टीव्हीच्या अँकर (Sansad TV anchor) आहेत. राज्यसभेतून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी अँकरपदाचा राजीनामा दिला आहे. ‘सांसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरुन मी पायउतार होत आहे. संसदीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनमानीपणे 12 खासदारांचं निलंबन करण्यात आले. मी खासदार म्हणून माझ्या कामाबद्दल कटिबद्ध आहे, तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्या बद्दल देखील कटिबद्ध आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घत आहे.’ असे चतुर्वेदी यांनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

 

12 खासदारांवर निलंबनाची कारवाई

राज्यसभेत गोंधळ घातल्या प्रकरणी 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने 12 खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.

 

पावसाळी अधिवेशनात काय घडलं?

विमा विधेयकावर (insurance bill) चर्चा सुरु असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आले. लोकसभेत केवळ 21 टक्के तर राज्यसभेत केवळ 28 टक्के कामकाज झाले.

 

निलंबित खासदार

1. प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)

2. अनिल देसाई (शिवसेना)

3. एलामरम करीम (सीपीएम) (Elamaram Kareem (CPM))

4. फुलो देवी नेताम (काँग्रेस) Phulo Devi Netam

5. छाया वर्मा (काँग्रेस) Chhaya Verma

6. रिपुन बोरा (काँग्रेस) Ripun Bora

7. राजामणी पटेल (काँग्रेस) Rajamani Patel

8. सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस) Syed Nasir Hussain

9. अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस) Akhilesh Prasad Singh

10. बिनय विश्वम (सीपीआय) Binay Vishwam (CPI)

11. डोना सेन (तृणमूल) Donna Sen

12. शांता छेत्री (तृणमूल) Shanta Chhetri

 

Web Title :- Priyanka Chaturvedi | shivsena mp priyanka chaturvedi resigns anchor sansad tv show after suspension rajya sabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पोलीस चौकीतील खुर्च्या फेकून देत पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना

Ghulam Nabi Azad | नवीन पक्ष स्थापन करणार का? गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टच सांगितलं…

Pune Blind Men’s Association | ‘पुणे अंध जन मंडला’चा ‘पुणे प्रार्थना समाज – डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार 2021’ने गौरव