सेनेच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदींची अवस्था ‘ऑड अँड इव्हन’, नेटकऱ्यांनी उडवली ‘खिल्ली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटला नसताना राज्यातील राजकारणावरून सर्वच पक्षातील नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. एखाद्या पक्षाच्या नेत्याचा संबंध दुसऱ्या पक्षाशी कसा जोडला जात आहे. तसेच पक्षांतर केलेल्या नेत्यांची कशी दयनीय अवस्था झालीय. आणि ज्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गोलो आता त्यांचीच गोची झाल्याने स्वग्रही परतण्याच्या तयारीत काही नेते आहेत. त्यामुळे कोणता नेता कोणत्या पक्षासोबत आहे हे सध्यातरी समजणे अवघड झाले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार स्थापन करेले असा दावा केला जात आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी शिवसेनेच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांची खिल्ली उडवली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनीच एक लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रियंका यांची खिल्ली उडविण्याच आल्याचे मिम्स दिसून येतात. त्यामध्ये प्रियंका यांना कुणी काँग्रेसच्या एजंट म्हटलंय, तर कुणी ऑड अँड इव्हनची उपमा दिली आहे. एक दिवस काँग्रेससोबत आणि एक दिवस शिवसेनेसोबत असे म्हणत त्यांची खिल्ली उडवलीय. तसेच, कांग्रेस आणि शिवेसेनेच्या एकत्रिकरणावरू प्रियंका यांचे अनेक मिम्स बनविण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कोण आहेत प्रियंका चतुर्वेदी ?
प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. महिलांची सुरक्षा, सन्मानाकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like